सोलापूर! गहाळ झालेला मोबाईल दिले शोधून; विद्यार्थी फैजल पठाण यांनी मानले आभार



सोलापूर/प्रतिनिधी:

पत्रकार भवन या ठिकाणी दुपारी १४.०० ते २२.०० वा. पर्यंत वाहतुक नियमन करीता शहर वाहतूक शाखेकडील पोलीस अंमलदार पोलिस शिपाई १३४९ विनायक जगन्नाथ काळे यांना नेमण्यात आलेले होते. यावेळी सांय. १९.३० वा. दरम्यान पत्रकार भवन येथुन दुचाकी वाहनावर जात असलेला विदयार्थी फैजल पठाण यांचेकडील काही महत्वाची शालेय कागदपत्रे व इतर महत्वाचा डाटा असलेला ओप्पो कंपनीचा अंदाजे रु.२५,०००/ किंमतीचा मोबाईल रस्त्यावर गहाळ झाला. सदर विदयार्थी घरी गेल्यानंतर त्याचा मोबाईल गहाळ झाल्याचे त्यांचे लक्षात आलेनंतर तो शोध घेत पत्रकार भवन याठिकाणी येवून पॉईटवरील पोलीस अंमलदार पोशि काळे यांना भेटून सदर घटनेबाबत सांगु लागला. 

सदरवेळी पोशि काळे यांनी पठाण यास घेवून पत्रकार भवन परिसरात शोध घेवून फैजल पठाण यांचा महत्वाची शालेय कागदपत्रे व महत्वाचा डाटा असलेला मोबाईल मिळवून दिलेला आहे.गहाळ झालेला मोबाईल शोधून परत मिळवून दिल्याबद्दल विद्यार्थी फैजल पठाण यांनी शहर वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई विनायक जगन्नाथ काळे यांचे मनापासून आभार मानले.

Post a Comment

1 Comments

  1. ▷ Casino Site in India Review by LuckyClub
    Casino Sites with a luckyclub Real Player Review ✌ Read our trusted 2021 Casino Sites ⏩ Check ⭐ Huge ⭐ Bonuses, Free Spins ⏩ Find the best Betting Site!

    ReplyDelete