बार्शी शहरातील बाळेश्वर नाक्यावर एका पान टपरीच्या बाजूला बेकायदा जुगार खेळला जातो खेळवला जातो अशी माहिती पोलिसांना मिळाली, त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता एक इसम पांढऱ्या कागदावर आकडेमोड करत असलेला दिसून आला. एक जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नऊ फेब्रुवारी रोजी 19/30 वा चे सुमारास बाळेश्वर नाका कासारवाडी चौकात स्वप्निल पान टपरीचे बाजुस इसम नाम विश्वनाथ पांडुरंग शेरखाने (वय ३४) धंदा मजुरी रा चोप्रा पलेस 729/38 कुर्डुवाडी रोड बार्शी जि सोलापुर हा अंदाजे येणारे अंक आकडयावर पैश्याची पैज लावुन स्वताची आर्थिक फायदयासाठी कल्याण नावाचा मटका जुगार खेळत व खेळवीत असताना 1150/- रोख रक्कम व जुगार साहित्ये मिळुन आले. त्याचे विरूध्द महा जुगार अँक्ट कलम12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments