लग्नांचे आमिष दाखवून विभक्त राहणाऱ्या विवाहितेवर पोलिसानेच अत्याचार केला. हा प्रकार १५ फेब्रुवारी २१ ते २९ जानेवारी २२ दरम्यान घडला. या प्रकरणी पोलिसाविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप लक्ष्मण पवार असे आरोपी पोलिसाचे नाव आहे. तो छावणी शीघ्र कृती दलात (आरसीपी पथक) कार्यरत आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
पतीसोबत पटत नसल्याने महिला काही दिवसांपासून विभक्त राहते. एका मॉलमध्ये काम करून दोन्ही मुलांचा उदरनिर्वाह भागविते. २०२१ मध्ये आरोपी पोलिस संदीप पवार हा कामानिमित्त मॉलमध्ये गेला होता. तेथे पीडितेशी त्याची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यातून पवारने तिला दोन मुलांसह स्वीकारून लग्नाचे आमिष दाखविले. तसेच १५ फेब्रुवारी २०२१ ते २९ जानेवारी २०२२ दरम्यान जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. लग्नासाठी तगादा लावल्यानंतर त्याने टाळाटाळ केली. या काळात तिच्याकडून आठ ते दहा लाख रुपये उकळले. ती गर्भवती असल्याचे समजल्यावर पवारने तिला गर्भपात करण्यास सांगितले. गर्भपात न केल्यास मुलांना मारून टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे भीतीपोटी तिने गर्भपात केला. या प्रकरणी छावणी ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा नोंदविला आहे.
0 Comments