वैराग/प्रतिनिधी:

वैराग शहरातील एक जणांनी दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून खिशातील पैसे हिसकावून घेत हत्याराने व दगडाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. अमन शेख फरिद शेख (वय १९) रा .आझाद चौक नवि पेठ वैराग ता. बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एकावर वैराग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे संतोष टायर्स वैराग येथे मोटरसायकल पंक्चर काढण्याचे काम करतो. सायंकाळी ०५.३० वा चे सुमारास दुकानावर काम करत असताना सलमान शेख हा माझे जवळ आला व मला दारु पिण्यास पैसे दे असे म्हणाला, त्यावर फिर्यादी त्यास पैसे नाहीत असे म्हणताच कानाखाली मारली व निघुन गेला. तो निघुन जात असताना त्यास मला मला का मारले असे विचारणा करताच तो परत माघारी आला व माझे गच्चीस पकडुन माझे खिशातील एकुन 12,000/-रु त्यात 2000/- रु दराच्या 05 नोटा व 500/-रु दराच्या 04नोटा असे पन्टच्या खिशातुन काढुन घेतले व तो तेथुन जावु लागला तेंव्हा मी त्याच्या पाठीमागे गेलो असता त्याने त्याचे पन्टच्या खिशातुन कुठलेतरी हत्यार काढले व माझ्या डोक्याच्या पाठीमागे मारले तेंव्हा मी खाली पडलो असता त्याने रोडवरील दगड उचलुन त्याने माझे पाठीत फेकुन मारला तेंव्हा मी तो मला आणखिन मारेल या भितीने मी तेथुन उठुन पळत वैराग पोलीस ठाणेस गेलो. फिर्यादी च्या डोक्यातुन रक्त येवु लागल्याने पोलीसांनी मला उपचार यादी देवुन सरकारी दवाखाना वैराग येथे पाठविले तेथे माझ्यावर प्रथमउपचार करुन माझ्या सोयीने पुढील उपचाराकरिता जगदाळे मामा हस्पिटल बार्शी येथे दाखल झालो आहे. उपचार चालु असुन पुर्णतः शुध्दीवर आहे झाले मारहाणीत माझे डोक्यास पाठीमागील बाजुस जखम झाली असुन पाठीत मुक्कामार लागलेला आहे. एकावर भादवि कलम ३२३,३३६ व ३३७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.