बार्शी - उस्मानाबाद शहरात पोलिसांवर आणि बार्शीतील प्राणीमित्र गोरक्षक धान्यकुमार पटवा यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. शनिवारी रात्री 11 वा. उस्मानाबाद शहरात बेकायदेशीर कत्तलखान्यावर 30 ते 35 पोलिसांच्या मदतीने छापा गोरक्षक धान्यकुमार पटवा यांनी छापा टाकला होता. त्यावेळी, पोलीस आणि गोरक्षकावर प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात 2 पोलीस आणि गोरक्षक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भ्याड हल्ल्याचा बार्शीतील सर्वच स्तरातून निःषेध करण्यात आला.
पटवा यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा बार्शीकरांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियातून या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करतानाच, आरोपींवर कडक कारवाईची मागणीही करण्यात आली आहे. धन्यकुमार पटवी यांचं गोरक्षण आणि प्राणीमित्र म्हणून गेल्या कित्येक वर्षांपासून काम आहे. ते आपल्या जीवाची पर्वा न करता गोहत्या आणि प्राणीहत्याविरोधात आवाज उठवतात. त्यामुळे, पटवा यांना सरकारने सुरक्षा पुरवावी, अशी मागणीही बार्शीतील प्राणीमित्रांकडून होत आहे.
0 Comments