‘पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे दोघीही दारू पिऊन…’ बंडातात्या कराडकर यांचं विधान



मुंबई :

 साताऱ्यात बंडातात्या कराडकर यांनी पायी वारीवरून महविकास आघाडीवर निशाणा साधला होता मात्र यावेळी बोलत असताना बंडातात्या कराडकर यांनी नेत्यांची मुलं रस्त्यावर दारू पिऊन पडत असल्याचे पुरावे आहेत असं म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळे नव्या चर्चाना उधाण आले आहे

सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे दारू पितात. नेत्यांची मुलं दारू पिऊन रस्त्यावर पडतात असं म्हटलं आहे. त्यांच्या या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. एवढंच नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवारांची जोडी म्हणजे ढवळ्याशेजारी पोवळा बांधला वाण नाही पण गुण लागला अशी आहे असं म्हणत सरकारवरही टीका केली आहे.

‘सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे दारू पिऊन नाचतात. सुप्रियाताई दाऊ पिऊन रस्त्यावर पडल्याचे फोटो ढिगाने मिळतील तुम्हाला. खासदार व्हायच्या आधीचे त्यांचे फोटो बघा. राजकारणात यायच्या आधी त्या दारू पिऊन पडत होत्या. सुप्रिया सुळेंनी सांगावं की बंडातात्या खोटं बोलतोय. सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे या दारू पिऊन नाच करतात. पतंगराव कदमांचा एक मुलगा कसा मेला? दारूच्या नादातून कसा गेला जरा शोधा. माझा पत्रकारांना प्रश्न आहे की कुठल्या पुढाऱ्याचा मुलगा पित नाही असं तुम्हाला माहित असेल तर मला सांगा. कऱ्हाडचे बाळासाहेब आमदार त्यांचा मुलगा दारू पितो की नाही? सगळ्यांची नावं सांगू का? मी सांगू शकतो’ असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

Post a Comment

0 Comments