बार्शी/प्रतिनिधी:
बार्शी तालुक्यातील शेळगाव आर येथे चारचाकी गाडीतून दारू विक्री करणाऱ्याला धाड टाकून रंगेहात पकडले. पोलीस कॉन्स्टेबल पंडित गणपत गवळी (वय ३२) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शेळगाव मधील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला, असून त्याच्याकडून एक लाख दोन हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या विषयी सविस्तर वृत्त असे की, वैराग पोलिसांना एक इसम चार चाकी गाडी मधून बेकायदा दारू विक्री करतो अशी गुप्तवार्ता बातमीदारा मार्फत मिळाले. त्यानुसार वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनय बहिर यांच्या मार्गदर्शनाखाली धाड टाकली. शेळगाव हद्दीत होटेल संकेत जवळ एक इसम हुंडाई सँनट्रो कंपनीची गाडीत बेकायदा दारू विक्री करताना आढळून आला. पंचा समक्ष त्याच्याकडून १) १६००/-रू मँगडोल न. १ व्हिस्की कंपनिच्या १० बाटल्या प्रत्येकी कि. १६०/- रु. २) ५४०/- रु. मँगडोल नं.१ रुम कंपनीच्या ४ निपा प्रत्येकी कि. १३५/-रु. ३) ५४०/- रु. देशी दारु टँगो पंच कंपनीच्या १८० एमएल नी भरलेल्या ९ निपा प्रत्येकी कि. ६० रु. ४) ४३५/- रु. डीएसपी कंपनीच्या ३ बाँटल प्रत्येकी किं १४५/- रु. ५) १,००,०००/- रु. एक गजगा रंगाची हुडांई सँन्ट्रो कंपनीची जिचा आरटीओ रजि. क्र. एमएच ४३ एक्स ३३८० अशी चारचाकी गाडी असा एकुण १,०२,८१५/ मुद्देमाल वैराग पोलिसांनी जप्त केला असून सचिन भादगुडे (वय ४०) रा. शेळगाव आर यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महारुद्र परजणे हे करत आहेत.
0 Comments