फडणवीस म्हणतात, संजय राऊत यांना पाचवीतील मुलगा घाबरतात


 राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते महाराष्ट्र राजभवनातील नव्या दरबार हाॅलचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्यातील नेते उपस्थित होते. यावेळी भाषण करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चौफेर टोलेबाजी केल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर आता ठाकरे यांच्या भाषणावर विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.

भाजपचे नेते सारखं राजभवनावर जातात आणि राज्य सरकारची तक्रार करतात, असं ठाकरे म्हणाले होते. यावर फडणवीसांनी महाविकास आघाडीवर जोरदार पलटवार केला आहे. तुमच्या मंत्र्यांसारखे आमचे नेते जेलमध्ये तर जात नाहीत त्यापेक्षा राजभवनात गेलेलं कधीही चांगलं कारण त्यामुळं सदबुद्धी तर मिळते, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.

ईडीच्या कारवाईवरून राऊत यांनी फडणवीस यांना जबाबदार धरत जोरदार टीका केली होती. त्यावर फडणवीस यांनी राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत जे डायलाॅग मारतात ते पाचवीतील मुलेही मारतात, कोण घाबरणार त्यांना, ते अस्वस्थ झाले आहेत, ते दिसत आहे, अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments