सांगली:
राष्ट्रीय न्याय संशोधन संस्था संकलित नुतन कॉलेज ऑफ फार्मसी विभागाचे प्रा.मनोहर केंगार यांची महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 'करिअर कट्टा' या उपक्रमाच्या सांगली जिल्हा समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली. महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांसाठी अत्यंत कमी खर्चात स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी या साठी 'करिअर कट्टा' हा उपक्रम सुरु केला . माझी नियुक्ती व काम करण्याची संधी मा. यशवंत जी शितोळे सर, (महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष व मार्गदर्शक) सर्व निवड समितीचे यांचे मनःपूर्वक धन्यवाद.
सांगली जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयीन समन्वयक (शहरी व ग्रामीण भागातील) यांच्या सहकार्याने येत्या वर्षभरात करिअर कट्टा केंद्रातर्गत नवं स्पर्धात्मक व्यासपीठ निर्माण करू, सर्वाधिक विद्यार्थी IAS व उद्योजक बनवू व स्पर्धा परिक्षांमधून भविष्यासाठी अधिकारी बनवूया असे अश्वासन केले. या निवडी बद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल पाटील व विभाग प्रमुख प्रा.प्रमोद चिक्कोडी यांनी विशेष अभिनंदन केले तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. संस्थेच्या अध्यक्षा डॉ नुतन माळी व संस्थेचे सचिव डॉ. रामलिंग माळी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्या दिल्या.
0 Comments