महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून मनुकुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती



महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्याकडून मुख्य सचिव पदाची सूत्रे स्वीकारली. मूळचे लखनौ येथील हे १९८६ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले.

श्री. मनु कुमार श्रीवास्तव यांनी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कोल्हापूर व नागपूरचे जिल्हाधिकारी, नागपूर महानगरपालिका आयुक्त, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, महसूल आणि वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अशा विविध पदांवर काम केले.

Post a Comment

0 Comments