तरूणाने देवळात नारळ फोडल्याने संपूर्ण गावाचा दलित समाजावर बहिष्कार


महाराष्ट्र हा फुल ,शाहू आणि आंबेडकर यांच्या विचाराने तयार झालेला महाराष्ट्र आहे अनितात्यांच्या विचारांवर चालणाराआजचा समाज आहे मात्रा द्दुसरीकडे राज्यात घडणाऱ्या घटनांमुळे अनेकवेळा महाराष्ट्राची मान खाली गेली आहे. लातूरच्या एका मंदिरात दलित तरूणाने दर्शन घेतलं आणि नारळ फोडला म्हणून संपूर्ण समाजावर बहिष्कार घालण्यातची घटना घडली आहे.

लातूर जिल्ह्यातील ताडमुगळी या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. लातूर जिल्ह्यातील ताडमुगळी गाव हे फक्त हजार लोकसंख्या असलेलं गाव आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात हे गाव असून कर्नाटकच्या सीमेजवळ हे गाव आहे. हे गाव तसं शांत असतं. मात्र तीन दिवसांपूर्वी झालेल्या एका घटनेने गावात तणाव निर्माण झाला.

गावातील रितभात एका दलित समाजाच्या मुलाने मोडली म्हणून गावात तणाव निर्माण झाला होता. तीन दिवसांपूर्वी हा तरूण मंदिरात गेला. देवाच्या पाया पडत असताना त्याने नारळ फोडला. त्यामुळे गावकरी चांगलेच संतापले आणि त्यांनी गावातल्या दलित समाजावर बहिष्कार टाकला. सर प्रकरण प्रकरण जेव्हा पोलिसांना समजलं तेव्हा पोलीस या गावात गेले. त्यांनी या सगळ्या प्रकरणात मध्यस्थी केली आणि बहिष्कार मागे घ्यायला लावला.

Post a Comment

0 Comments