पंढरपूर:
राज्यातील वातावरण दूषित करण्याचे काम काही लोकांनी सुरू केले आहे. राज्यासह देशांमध्ये अशा प्रकारच्या पद्धतीचा राजकारण्यांचा अवलंब कोणत्याही राजकीय पक्षांनी केला नाही सरकारी यंत्रणाचा वापर अशा पद्धतीने वैयक्तिक आयुष्यात कधीही झाला नव्हता. राज्यातील जनतेला या यंत्रणेचा वापर कशा पद्धतीने केला जातो याचा परिचय येत असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये राष्ट्रवादी कांग्रेस परिवार संवाद रॅलीच्या पाचवा पर्वाचे आयोजन पंढरपूर येथील संत तनपुरे महाराज मठ येथे करण्यात आले होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत व पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधताना जलसंपदा मंत्री पाटील यांनी हे वक्तव्य केले यावेळेस त्यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभवाची कारणेही कार्यकर्त्यांसमोर मांडल्या यावेळेस त्यांनी राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्ष पासून ते तळागाळातील पदाधिकाऱ्यांपर्यंत माझी शाळा घेतली.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांनी मेळाव्याला सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस मधील गट तट राजकारणाविषयी प्रदेशाध्यक्षांसमोर उघड नाराजी व्यक्त केली. तसेच महाविकासआघाडी ने सोलापूर जिल्ह्यात केलेल्या कामाविषयी माहिती देण्याची सूचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना यावेळेस पालकमंत्र्यांनी दिली.
0 Comments