बार्शीमध्ये अपघातात जखमी झालेल्या वृद्धाने हॉस्पिटलमध्ये सोडले प्राण



बार्शी/प्रतिनिधी:

बार्शी शहरांमध्ये मोटारसायकलच्या धडकेत वृद्ध गंभीर जखमी होऊन सुविधा हॉस्पिटल बार्शी येथे प्राण सोडले आहेत. सिद्धेश्वर भगवान वैद्य (वय ७५) अपघातात जखमी होऊन मृत्यूमुखी पडलेल्या वृद्धाचे नाव आहे.

याविषयी सविस्तर वृत्त असे की, बार्शी लातूर रोडवर टेक्निकल हायस्कूल जवळ भाजी विक्रेतेला पाठीमागून जोरदार धडक देऊन जखमी केले.  आपल्या हातातील वाहन हातघाईने अविचाराने चालवल्याबद्दल स्वतः जखमी होऊन एक जनाचा मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी मोटरसायकल क्रमांक एम एच १३ डी एस ६६७७ या मोटरसायकलचा चालक धीरज अरुण खोडवे वय ३२ हेडे गल्ली बार्शी यांच्यावर भा.द.वी.कलम ३०४ (अ),२७९,३३७, ३३८, ४२७, सह मोटार वाहन अधिनियम कलम १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या घटनेचा अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

Post a Comment

0 Comments