बार्शी/प्रतिनिधी:
बार्शी तालुक्यातील गौडगाव येथे ग्रामपंचायत गौडगाव आणि साई आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल तर्फे शिवजयंती निमित्त सर्व रोग निदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरात मध्ये २०० रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच औषधें ही मोफ़त देण्यात आली. तसेच किशोरवयीन मुलींना 'वयात येताना उद्भवणाऱ्या समस्या तसेच स्वच्छतेविषयी डॉ. संगीता देशमुख यांनी मार्गदर्शन केले.
या शिबिरात साई चॅरिटेबल ट्रस्ट च्या अध्यक्षा डॉ. मीरा सूर्यवंशी, तसेच साई आयुर्वेद कॉलेजचे प्राचार्य डॉ. सायबु गायकवाड सर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
या शिबिरात साई आयुर्वेदिक कॉलेज व हॉस्पिटल येथील डॉ. संगीता देशमुख स्त्री रोग तज्ञ, डॉ. अंजु गायकवाड बालरोगतज्ञ, डॉ. नूरजहाँ मुजावर स्वस्थरोगतज्ञ, डॉ. रियाज तांबोळी बालरोग तज्ञ, डॉ. प्रशांत गवळी आयुर्वेद तज्ञ तसेच साई काॅलेजच्या शिकाऊ विद्यार्थ्यांची टीम सिस्टर नयना, शेख मॅडम, प्रशांत खोबरे तसेच विकास सोसायटीचे चेअरमन हिराचंद शिंदे, बालाजी पैकेकर, राहुल भड, नागेश काजळे, पांडुरंग पाटील, काकासाहेब भड, नंदकुमार गरड, संजय भड, अनिल यादव, संतोष भड, सतीश भड, राकेश गरड, बालाजी भड, संपत भड आदी उपस्थित होते.
0 Comments