अकलूज! भरदिवसा साडेसात लाखाची बॅग पळविली...



अकलूजमध्ये भरदिवसा चार चाकी गाडीची काच उघडी असल्याचा फायदा उठवत दोन अज्ञात चोरट्यानी सात लाख तीस हजार रुपयाची रक्कम गाडीतून पळवून नेली.

अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अकलूजमध्ये शुक्रवारी (दि. ११) आनंद नगर येथे राहणारे वैभव विठ्ठल घाडगे हे त्यांचे मित्र मनोज चव्हाण यांची चारचाकी गाडी घेऊन नवीन पेट्रोलपंप घोडाबाजाराजवळ बायपास रोड अकलूज, शिवम व्हील आलायमेंट येथे चारचाकी गाडी डॅशबोर्डचे कामाकरिता घेऊन गेले होते. गाडीमध्ये सात लाख तीस हजार रुपयांची कॅश कॅरीबॅगमध्ये ठेवले होती.  दरम्यान दुपारी दोन वाजून ४५ मिनिटांनी पाळत ठेवलेल्या दोघा पैकी एक जणाने गाडीची काच अर्धवट उघडी असल्याचे पाहिले. हीच संधी साधून अर्धवट उघडे असलेले काचेतून आत हात घालून सदर पैशाची कॅरीबॅग चोरली. त्यानंतर मोटरसायकलवरून दोघे चोर पसार झाले.

याबाबत अकलूज पोलीस ठाण्यामध्ये  भा द वि कलम ३७९,३४ प्रमाणे फिर्यादी वैभव विठ्ठल घाडगे (वय ३० वर्ष धंदा शेती, राहणार आनंदनगर, तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर) यांनी अज्ञात दोन चोर आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तक्रार दाखल होताच अकलूज पोलिसांनी सर्व चौकातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता संशयित चोरांचे फुटेज, फोटो घेऊन पुढील तपास अकलूज पोलिस स्टेशनचे एपीआय जाधव करीत आहेत. 


Post a Comment

0 Comments