धक्कादायक! गर्लफ्रेंड वरून एकाने फोडली दुसऱ्यांचे डोके



ठाणे :

अकरावी वर्गात शिकणाऱ्या वर्गमित्राने आपल्या गर्लफ्रेंडचे नाव दुसऱ्या मित्राला सांगितल्याच्या वादातून जोरदार राडा झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भिवंडीतील भोईवाडा पोलीस ठाण्यात चार राडेबाज मित्रांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

पोलीस सूत्राने दिलेल्या माहिती नुसार, कोकण मुस्लीम एज्युकेशन सोसायटीकॉलेजमध्ये अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलगा व संशयित असलेले मुले हे वर्गमित्र आहेत. 31, जानेवारीला दुपारच्या सुमारास महाविद्यालयात एका वर्गमित्राने दुसऱ्या वर्गमित्राला संशियताच्या गर्लफ्रेंडचे सांगितले. त्यामुळे ज्याने नाव सांगितले व ज्याच्या गर्लफ्रेंडचे नाव सांगितले या दोघांचे भांडण झाले होते. भांडण मिटविण्यसाठी राडेबाजांनी त्या मुलाला भिवंडीतील कारीवली रोडवरील आजमी हॉटेलजवळ रात्री साडेआठच्या सुमारास बोलावले होते.

आजमी हॉटेलजवळ रात्री 8 वाजण्याच्या सुमारास भांडण मिटवण्याच्या उद्देशाने तो मुलगा गेला असता त्याठिकाणी संशयित एकत्रित होते. मुख्य संशयित आरोपीने 'तु माझ्या गर्लफ्रेंडचे नाव का सांगितले', असे म्हणत पुन्हा वाद घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी मुख्य संशयित आरोपी साद कुंगलेने त्याठिकाणी पडलेला दगड उचलून मुलाच्या डोक्यात मारून त्याला गंभीर जखमी केले. या प्रकरणातील संशयित आरोपी व जखमी मुले ही सज्ञान आहेत की अल्पवयीन आहेत, याबाबतचा खुलासा पोलिसांनी दिला नसून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एस.एस. मागाडे हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments