आपल्या प्रियकराशी लग्नगाठ बांधत एका लोकप्रिय अभिनेत्रीने वैवाहिक आयुष्याची सुरुवात केली. धुमधडाक्यात गोव्याच्या किनाऱ्यावर तिचा विवाहसोहळा पार पडला. कुटुंबीय आणि खास मित्रमंडळींनी तिच्या या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती.
सोशल मीडियामुळे तिचा हा विवाहसोहळा चाहत्यांनाही पाहता आला. लग्न झालं, आफ्टरपार्टी झाली, पाहुणे आणि मित्रांच्या भेटीगाठीही झाल्या. ज्यानंतर आता ही अभिनेत्री गेली आहे हनीमूनला. बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये सध्या पतीसोबत काही खास क्षणांचा आनंद घेणारी ही अभिनेत्री आहे, मौनी रॉय.
सहसा सेलिब्रिटी हनीमूनसाठी परदेशात जाण्याला पसंती देतात. पण मौनीनं मात्र काश्मीरला जात सर्वांना थक्क केलं. इथून तिनं हॉटेलच्या रुमपासून बाहेरच्या नयनरम्य दृश्यापर्यंत साऱ्याचीच झलक दाखवली.
रिल्स, इन्स्टा स्टोरी, फोटो, व्हिडीओ असं सर्वकाही शेअर करत मौनीनं हे क्षण चाहत्यांच्याही भेटीला आणले.
0 Comments