आयएसओ मानांकन च्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना मुलभूत सुविधा यासोबतच ग्राहकाला चांगली वागणूक, चांगली वर्तणूक मिळावी अशा वारंवार सूचना मा.उपायुक्त डॉ. त्रिगुण कुलकर्णी साहेब यांच्याकडून मिळत असताना सांगोला तालुक्यातील पुरवठा निरिक्षक अश्विनी दराडे यांच्याकडून चक्क ज्येष्ठ दुकानदार ह्यांनाच अर्वाच्य भाषेत शिवीगाळ तसेच मानसिक त्रास देत असल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे.नामदेव राजाराम लिगाडे (वय ७०) रा.मौजेकडलास, ता.सांगोला यांनी अश्विनी दराडे,पुरवठा निरीक्षक (तहसील कार्यालय सांगोला) ह्यांच्या गैरवर्तणुकीबाबत मा.मुख्यमंत्री,मा.अन्नपुरवठामंत्री,मा. उपायुक्त पुरवठा,मा. जिल्हाधिकारी सोलापूर,मा.जिल्हा पुरवठा अधिकारी सोलापूर,मा.तहसीलदार सांगोला,मा.पोलिस अधीक्षक सोलापूर,मा.पोलीस निरीक्षक सोलापूर तसेच मा.जिल्हाध्यक्ष सोलापूर रास्त भाव दुकानदार संघटनेला देखील निवेदनातून तक्रार अर्ज मांडलेला आहे.
सदर निवेदनातून संबंधित पुरवठा निरीक्षकांनी गैरवर्तन केल्याबद्दल तक्रार दिल्याने सदर लेखी अर्जावरुन न्याय न मिळाल्यास दि.२५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर आत्मदहन करणार असल्याचे निवेदनांतून म्हंटले होते ,त्या अनुषंगाने आज दिनांक २५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आत्मदहना करता आले असता पोलीस व जिल्हा प्रशासनाच्यावतीने लवकरच संबधितावर काईवाईच्या आश्वासनानंतर नामदेव लिगाडे यांनी आत्मदहन रद्द केलेली आहे.सदर प्रसंगी जिल्हा संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख नितीन पेंटर, जिल्हा उपाध्यक्ष उमेश आसादे,अ झोन अध्यक्ष अभिजित सड्डो, मिलिंद चौगुले,बाबू उप्पीन,पतंगे,बाळकृष्ण गायकवाड उपस्थित होते.
0 Comments