सांगोला! कंटेनरचालकाचे अपहरण करून खून



सांगोला/प्रतिनिधी:

अज्ञात कारणावरून पाच ते सहा अनोळखी व्यक्तींनी जिवे ठार मारण्याचा उद्देशाने कंटेनरचालकाचे अपहरण करून त्याच्या डोक्यात मारहाण करून खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या इराद्याने अपघात झाल्याचा बनाव करून त्यास दगडामध्ये टाकून पसार झाले.

 ही घटना सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास उदनवाडी ते चोपडी (ता. सांगोला ) रोडलगत भारत वलेकर यांच्या शेताजवळ उघडकीस आली. संजय भगवान चव्हाण (वय. ३०, रा. महमदाबाद – हुन्नूर, ता. मंगळवेढा) असे मृताचे नाव आहे. याबाबत भगवान बाबू चव्हाण (रा. महमदाबाद-हुन्नूर, ता. मंगळवेढा) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात पाच ते सहाजणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment

0 Comments