तुळजापूरच्या पोराची आयपीएल मध्ये दीड कोटी रुपयात बोली


तुळजापूर/प्रतिनिधी:

 आयपीएलच्या ( २०२२ ) पंधराव्या हंगामासाठी बेंगलोर येथे आज दुसऱ्या दिवशी उर्वरित खेळाडुंसाठी लिलाव होता , चेन्नईने तुळजापूर च्या राजवर्धनवर बोली लावत त्याला दीड कोटी रुपयांना खरेदी केलंय.

राजवर्धन हंगरगेकर हा तुळजापुर येथील माजी आमदार साहेबराव हंगरगेकर यांचा नातू असून उस्मानाबादून शिक्षण आणि क्रिकेटचे धडे गिरवण्यासाठी तो पुण्यात गेला. तिथे काही वर्ष त्याने मेहनत घेतली. भारतीय क्रिकेट संघात खेळायचं हे स्वप्न उराशी ठेवून राजवर्धनने ३ वर्ष घाम गाळला. कोविडच्या काळातही त्याने कसून सराव केला. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर राजवर्धन हंगरगेकर अंडर १९ world cup मध्ये अष्टपैलु क्रिकेटर म्हणून खेळला. चेन्नई सुपर किंग्ज या संघाकडून राजवर्धनला संधी मिळतेय, म्हणुन तुळजापुर शहरात जल्लोष साजरा होत आहे.

Post a Comment

0 Comments