बार्शी :
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त हिंदवी समाचार व श्री दत्त बालचिकित्सालय बार्शी, यांच्या संयुक्त विद्यमाने "मराठी सुंदर हस्ताक्षर" स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धा वार रविवार, दिनांक 13 फेब्रुवारी 2022 रोजी, संत तुकाराम सभागृह, श्री शिवाजी कॉलेज शेजारी बार्शी, या ठिकाणी सकाळी दहा वाजता संपन्न होतील.
प्राथमिक गट - इयत्ता १ वी ते ४थी, उच्च प्राथमिक गट - ५ वी ते ७ वी, व माध्यमिक गट - ८ वी ते १० वी या तीन गटांमध्ये स्पर्धा होतील. प्रत्येक गटातून विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ २, प्रत्येकी रोख रक्कम, ट्रॉफी व प्रमाणपत्र दिले जाईल. तरी बार्शी शहर व तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन हिंदवी समाचार चे मुख्य संपादक धिरज शेळके यांनी केले आहे.
0 Comments