बार्शी/प्रतिनिधी:
नुकतीच उपशिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग उस्मानाबाद येथे नियुक्त झालेले रावसाहेब मिरगणे यांचा सत्कार शिवसाई प्रतिष्ठान उपळाई रोड बार्शी यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला. रावसाहेब मिरगणे हे मूळचे बार्शी तालुक्यातील मांडेगाव चे सुपुत्र आहेत तसेच ते एक उत्तम प्रशासक म्हणून नावाजले जातात.
या सत्कार समारंभावेळी सत्कार करताना नारी गावचे पोलिस पाटील वैभव माळी, शेती मित्र गांडुळ खत प्रकल्प बार्शीचे संचालक ज्ञानेश्वर गुंड, वरिष्ठ सहाय्यक समाज कल्याण उस्मानाबाद चे अमोल कातंगळे, शिवसाई उदयोग समूहाचे अभय पाटील, शिवाजी महाविद्यालय बार्शीचे प्रा. समाधान लोंढे, दप्तर कारकुन जवळगाव मध्यम प्रकल्प बार्शीचे रत्नाकर कांबळे, संदीप पाडुळे, राजेश तालीकोटी, नागेश चह्वान, कुंदन कुलकर्णी उपस्थित होते.
0 Comments