कुसळंब ता.बार्शी येथील डॉ. सुधिर चंद्रकांत ठोंगे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या वतीने घेण्यात आलेले महाराष्ट्र राज्य प्राध्यापक पात्रता परीक्षा (सेट) समाजशास्त्र ह्या विषयात उत्तीर्ण झाले. सध्या ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फरताडे वस्ती,मस्सा (खं) ता. कळंब जि.उस्मानाबाद येथे सहशिक्षक या पदावर कार्यरत आहे.
त्यांचा कुसळंब ग्रामस्थ व मित्र परिवारातर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गावचे प्रथम नागरिक सरपंच शिवाजी खोडवे, उपसरपंच किशोर काशीद, संजय बोकेफोडे, पोलीस पाटील गणेश काळे, ग्रामपंचायत सदस्य वैभव पोटरे, रोहित शिंदे ,धनाजी काशीद, शिवाजी शिंदे, विनोद पवार, अजय ननवरे,अशोक झोंबाडे, विजय शिंदे, रवींद्र धावडे सर . मित्रपरिवार अजय उकरंडे, संभाजी खोडवे ,सागर उकरंडे, अमित शिंदे,समाधान शिंदे अभिजित पवार,समाधान उकरंडे, अभिजीत जाधव व सर्व मित्र परिवार ने उपस्थित राहून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
0 Comments