शाहरूख खानने जिंकली मनं ! 'हाच भारत आहे अन् असाच राहू द्या'



बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने पुन्हा एकदा लोकांची मनं जिंकली. शिवाजी पार्कवर जाऊन शाहरूख खानने लता मंगेशकर यांचं अंत्यदर्शन घेतलं. यावेळचा शाहरुख खानचा फोटो काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनेकांनी शाहरुख खानचा फोटो शेअर करत त्याचं कौतुक केलं. 

 लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्काराला पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह अनेक मान्यवर उपस्थित होते. अभिनेता शाहरूख खाननेही शिवाजी पार्कवर येऊन लता मंगेशकरांना अखेरचा निरोप दिला. इतरांप्रमाणेच शाहरुख खानने लता मंगेशकरांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. तसंच त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी अशी दुवाही केली. शाहरूख खानचा अंत्यदर्शन घेतानाचा आणि दुवा मागतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत अनेकांनी त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला आहे.


भावना नावाच्या यूजरने शाहरुख खानचा फोटो ट्वीट करत म्हटलं आहे की, 'हाच भारत आहे आणि असाच राहू द्या. एकत्र कसं राहायचं हे आम्हाला माहिती आहे. कोणताही राजकीय पक्ष योग्य नाही. प्रत्येकांचा स्वतः अजेंडा आहे. प्रत्येक गोष्टीत चुका शोधण्यासाठी जागे होऊ नका आणि कुणाचं आंधळेपणाने अनुकरण करणारेही होऊ नका.'

Post a Comment

0 Comments