बार्शी! शेताला पाणी देण्याच्या कारणावरून भावाने भावाला दिली करंट देऊन जीवे मारण्याची धमकी


बार्शी तालुक्यातील घोळवेवाडी येथे सामायिक बोर मधील पाणी देत असताना भावाने भावाला शिवीगाळ व मारहाण करून करंट लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बिभिषण देविदास घोळवे (वय ४०), रा. घोळवेवाडी ता. बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एकावर पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ जानेवारी रोजी सकाळी ९.०० वा चे सुमारास शेतामध्ये समाईक बोर चालु करून कांदाला पाणी देत होतो, त्यावेळेस फिर्यादीचा भाऊ शिवाजी देविदास घोळवे रा. घोळवेवाडी  हा शेता मध्ये आला व त्याने बोर बंद केला. तुझा आणि बोर चा काही संबंध नाही इथून पुढे जर तो बोर चालू केला तर तुला करंट ठार देऊन मारीन अशी धमकी देऊन शिवीगाळ व मारहाण केली. त्यासोबतच पत्नी भाऊ वडील यांनाही अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. त्यामुळे एकावर पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीमध्ये गंभीर जखमी झाल्यामुळे सिव्हिल हॉस्पिटल उस्मानाबाद येथे माझ्यावर उपचार चालू होते पूर्ण बरा झाल्यावर पांगरी पोलिसात फिर्याद दिली आहे.

Post a Comment

0 Comments