'हे' सुप्रसिद्ध अभिनेते रुग्णालयात दाखल...


बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते अमोल पालेकर यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ७७ वर्षीय अभिनेत्याला पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्याच्या आजारपणाची बातमी समजताच चाहत्यांनी  त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अमोलची पत्नी संध्या गोखले यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमोल पालेकर यांच्या पत्नी संध्या गोखले यांनी सांगितले की, अमोलची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तथापि, काळजी करण्यासारखे काही नाही. जास्त धुम्रपान केल्यामुळे त्यांची  प्रकृती अगोदरच खालावली होती असेही संध्याने सांगितले. त्यांनी यापेक्षा अधिक काही बोलण्यास नकार दिला.

Post a Comment

0 Comments