दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर विराट कोहलीनं कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं सातत्यपूर्ण कामगिरी करताना कसोटी क्रमवारीत ( ICC Test ranking) सातव्या क्रमांकावरून अव्वल स्थानापर्यंत प्रवास केला.
पण, विराटनं कसोटी संघाचे नेतृत्व सोडले अन् आयसीसीनं जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत टीम इंडियानं अव्वल स्थान गमावले. ऑस्ट्रेलियाचा संघ आता कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे, तर भारताला दोन स्थान खाली घसरावे लागले आहे.
पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघानं अॅशेस मालिकेत इंग्लंडवर ४-० असा दणदणीत विजय मिळवला आणि त्याचा फायदा त्यांना आयसीसी क्रमवारीत झाला. आफ्रिकेनं कसोटी मालिकेत भारतावर २-१ असा विजय मिळवला आणि हे भारताच्या घसरणीचे प्रमुख कारण ठरले. न्यूझीलंडनं दुसरे स्थान कायम राखले आहे.
0 Comments