“शरद पवार ST महामंडळाकडे आयपीएलच्या खेळाप्रमाणे पाहत आहेत”



कर्मचाऱ्यांनी अजूनही संप सुरुच ठेवला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतली होती.यावेळी पवारांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार केला जाईल, असं म्हटलं आहे. यावरून वकील गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

शरद पवार आणि परब यांनी घेतलेली पत्रकार परिषद अतिशय लाजीरवाणी होती. शरद पवार हे एसटी(ST) महामंडळाकडे एखाद्या आयपीएलच्या खेळाप्रमाणे पाहत आहेत. त्यांना कर्मचाऱ्यांच्या मृत्यूवर बोलावसं वाटलं नाही. त्यामुळे ते कर्माचाऱ्यांच्या जीवाचा खेळ समजत आहेत’, अशी टिका सदावर्ते यांनी केली आहे.
 

‘शरद पवार हे एसटी महामंडळाकडे एखाद्या आयपीएलच्या खेळाप्रमाणे पाहत आहेत. तसेच कामगारांच्या मृत्यूला आत्तापर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब जबाबदार होते. आता शरद पवारही जबाबदार असतील. तशी नोंद आता यापुढे केली जाईल’, असा इशाराही सदावर्ते यांनी दिला आहे.दरम्यान, शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचं आवाहन केलं आहे. तसचं एसटीची आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणल्यास कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार केला जाईल, असंही पवारांनी यावेळी सांगितलं आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचारी शरद पवारांच्या आवाहनाला दाद देतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Post a Comment

1 Comments