ज्येष्ठ नेते एनडी पाटील यांचे प्रकृती अस्वास्थ्यामुळे निधन झाले. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. ११ जानेवारी रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. अॅपल सरस्वतीचे डॉक्टरांनी एनडी पाटील यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती दिली. त्याना उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकाराचा त्रास होता. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यावर उपाचार सुरु होते. ११ जानेवारीला त्यांना बोलण्यात अडथळा येत होता. तेव्हा रुग्णालयात सिटी स्कॅन केल्यानंतर वैद्यकीय उपचार करण्याचा निर्णय घेतला. त्यांची प्रकृती ढासळत चालली होती.
सांगलीत एका सामान्य शेतकरी कुटुंबात १५ जुले रोजी एनडी पाटील यांचा जन्म झाला. पुणे विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र आणि एलएलबीचे शिक्षण घेतले. पुढे १९५४ ते १९५७ या कालावधीत त्यांना साताऱ्यात छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणूनही काम पाहिले. तसंच कमवा व शिका योजनेचे प्रमुख आणि रेक्टर म्हणून ते कार्यरत होते
0 Comments