‘मी बाजीराव आहे, तर माझी मस्तानी कुठंय’ - गिरीश बापट


भाजपचे जेष्ठ नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट हे आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असलेले पहायला मिळतात. परवा पुण्यामध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात त्याच्या एका वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

एका वेळी कार्यक्रमात गिरीश बापट यांच कौतुक करताना अॅड सुरेश पलांडे यांनी म्हणलं की गेल्या 40 वर्षात ज्यांना कोणी हरवू शकले नाही, असे पुण्याचे खरे बाजीराव म्हणजे गिरीश बापट आहेत.

सुरेश पलांडे यांच्या वक्तव्यावर मिश्किल बापट यांनी डोक्याला हातच लावला. ‘मी बाजीराव आहे, तर माझी मस्तानी कुठंय’, असं म्हणत बापटांनी पलांडे यांच्या वक्तव्यावर टिप्पणी केली. बाजीराव-मस्तानीच्या प्रेमकहानीमुळे पुणे जसं चर्चेतच आहे. दरम्यान, ‘तुम्ही खरोखरच बाजीराव आहात. पण, तुमच्या मस्तानीबद्दल अजून आम्हाला काहीच माहिती मिळालेली नाही’, असंही यावेळी सुरेश पलांडे यांनी म्हटलं.

Post a Comment

0 Comments