बार्शी/प्रतिनिधी:
बार्शी तालुक्यातील सासुरे गावांमध्ये अवैधरित्या विनापरवाना जुगार अड्ड्यावर वैराग पोलिसांनी छापा टाकून सात जणांवर कारवाई केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील सासुरे येथील लोकमंगल कंपनीचे शेतात पोल्ट्री फाँर्मवर शेडचे बाजूला गोलाकार बसुन आपले फायद्याकरीता बेकायदेशीररित्या मन्ना नावाचा ५२ पानी पत्याचा पैशाची पैज लावुन जुगाराचा खेळ खेळत असताना मिळुन आले. म्हणुन आरोपी नंबर १. संतोष आबाराव काकडे २. शिवाजी उध्दव ताकभाते ३. राजकुमार गोपीनाथ करंडे ४. रमेश शामराव कांबळे ५. पांडुरंग ज्याती कंरडे ६. धन्यकुमार हरी दळवी ७. पळून गेलेला ईसम दादा अब्बास शेख सर्व रा. सासुरे ता.बार्शी यांच्या मुंबई जुगार कलम १२ (अ) प्रमाणे सरकार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई वैराग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनय बहिर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महारुद्र परजणे, पोलीस कॉन्स्टेबल भोरे, पोलीस नाईक पाडुळे, पोलीस कॉन्स्टेबल शेरखाने यांच्या पथकाने केली आहे.
0 Comments