बार्शी! वाहतुकीस अडथळा व कोरोना नियमाचा भंग प्रकरणी प्रसन्नदाता चहा कॅन्टींगवाल्या वर शहर पोलिसात गुन्हा दाखल


बार्शी/प्रतिनिधी:

बार्शी शहरातील पांडे चौका नजीक वाहतुकीस अडथळा व कोरोना नियमाचा भंग केल्याप्रकरणी प्रसन्नदाता चहा वाल्यावर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 जानेवारी रोजी  सायं19/20 वा. चे सुमारास  इसम विनोद लक्ष्मण वडतीले वय.36 वर्ष रा. पाटील चाळ  बार्शी ता.बार्शी जि.सोलापुर याने  प्रसन्न दाता  कफीची व चहाची विक्री करुन कँनटीन समोर छत लावून रहदारीस अडथळा होईल असे कृत्य केले आहे. तसेच जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केलेल्या आदेशाचे उल्लंघन करुन  हयगयीने मानवी जिवीत व व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात येईल, असे कृत्य करुन व कोवीड 19 या रोगाचा संसर्ग पसरविण्याची घातक कृती करुन शासनाचे आदेशाचे उल्लंघन केले आहे.  त्यांचेविरुद्ध भा.दं.वि. संहिता कलम 188, 269, 270 ,, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51(ब), साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम चे कलम 2,3,4 व महा.कोविड विनीमय 2020 चे कलम 11 व मोटार वाहन अधिनियम कलम 283 या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments