सोलापूर/प्रतिनिधी:

सोलापूर शहरातील महावीर चौकात वाहनधारकाकडून महिला वाहतूक पोलिसासोबत असभ्य वर्तन झाले आहे.रॉनग साईडने जात असलेल्या वाहनधारकास महिला वाहतूक पोलिसाने रोखले असता तरुणाने हुज्जत घालून मोठा गोंधळ केला.पोलीस आयुक्तालय जवळच असल्याने महावीर चौकात आरसीपीचे जवान ताबडतोब दाखल झाले.त्यांनी सम्बधित तरुणाची समजूत घातली असता वाहनधारक तरुणाने त्यांसोबत अरेरावीची भाषा करत आरसीपीच्या पोलिसांसोबत हातापायी केली.सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असल्याने पोलिसांनी त्याला सदर बाजार पोलीस ठाण्यात आणून गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू करण्यात आली आहे.त्यावर सरकारी कामात अडथळा गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी सांगितली आहे.होटगी रस्त्यावर असलेल्या महावीर चौकात रॉनग साईडने जाताना त्याला महिला वाहतूक पोलिसाने अडवून ऑनलाइन दंड मारण्यासाठी फोटो काढला होता.प्राथमिक माहितीनुसार सम्बधित तरुणाचे नाव ताहीर मुसद्दीक पटेल(वय 31 वर्ष,रा एस.बी आयकॉन,आसरा चौक,सोलापूर) आहे.गुन्हा दाखल करण्यासाठी वाहतूक शाखेचे वरीष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल झाले.