बार्शी ! पाथरी गावातील आयुष्यभर कष्टाने कमाविलेल्या दागिन्यांवर चोरट्यांनी मारला डल्ला; वृद्ध दाम्पत्याचे दहा महिन्यांपासून एसपी कार्यालयात हेलपाटे


सोलापूर-बार्शी तालुक्यातील पाथरी या गावातील निवृत्त शिक्षक यांनी काबाडकष्ट करून मुलांच्या लग्न कार्यासाठी पैपै जमा करून दागिने घेतले होते.पण चोरट्यांनी 1 एप्रिल 2021 रोजी 23 तोळे दागिने आणि रोख रक्कम अशा मुद्देमालावर करूनडल्ला मारला.गेल्या दहा महिन्यांपासून पाथरी येथील वृद्ध दाम्पत्य बार्शी पोलीस ठाणे आणि पोलीस अधीक्षक कार्यालयात आर्त हाक देत चोरीचा तपास लावा अशी मागणी करत आहेत.आयुष्यभर राबराबूनकमावलेल्या दागिने मिळवून द्या अशी विनंती केली आहे.पण गेल्या दहा महिन्यांपासून या चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना अपयश आले आहे.26 जानेवारीचे औचित्य साधून सर्जेराव वैजुनाथ पाटील(वय 72,रा पाथरी ता बार्शी,जि सोलापूर) हे आपल्या पत्नी सह उपोषणाला आले होते.पण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पुन्हा आश्वासन देत परत पाठविले आहे.

1 एप्रिल 2021 रोजी घरफोडी झाली होती-
सिंधू सर्जेराव पाटील या आपल्या पाथरी येथील राहत्या घरी कुलूप लावून एका कार्यक्रमाला गेल्या होत्या.आणि सर्जेराव पाटील हे देखील कामानिमित्त बार्शी येथे गेले होते.बंद घर बघून चोरट्याने संधी साधली.भर दिवसा घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटमधील 23 तोळे वजनाचे दागिने आणि 15 हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण 8 लाख 89 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.सर्जेराव पाटील हे घरी परतल्यावर त्यांना चोरीची घटना माहिती झाली आणि बार्शी पोलीस ठाण्यात 1 एप्रिल 2021 रोजीच फिर्याद दाखल केली होती.पण आजतागायत एवढ्या मोठ्या घरफोडीचा छडा लावण्यात बार्शी पोलिसांना अपयश आले आहे.

वृद्ध दाम्पत्यास ग्रामीण पोलिसांकडून आश्वासनांचा डोंगर-
बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस कर्मचारी आणि अधिकारी हे वृद्ध सर्जेराव पाटील आणि त्यांच्या पत्नीस फक्त आश्वासन देत आहेत.अखेर त्यांनी एसपी कार्यालयात येऊन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची भेट घेऊन कैफियत मांडली.पोलीस अधिक्षक यांनी देखील आश्वासने दिली पण चोरीचा तपास लावण्यात ग्रामीण पोलीस दलाला अपयश आले आहे.

26 जानेवारी रोजी आमरण उपोषणाला बसले असता पोलिसांनी उठविले-
सर्जेराव पाटील हे निवृत्त शिक्षक आपल्या पत्नीसह 26 जानेवारी चोरीचा छडा लावा अशी मागणी करत पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर  आमरण उपोषणाला बसणार होते.पण पोलिसांनी उपोषण करण्यास मनाई केली आणि एसपी तेजस्वी यांकडे म्हणणे मांडा असे सांगितले.सहकुटुंबासह आलेलं वृद्ध दाम्पत्याने पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन चोरीचा तपास लावा आणि आमची आयुष्यभर कामविलेलं मुद्देमाल मिळवून द्या अशी मागणी केली.अखेर या वृद्ध दाम्पत्यास फक्त आश्वसन मिळाले.

Post a Comment

0 Comments