टेलीविजनवरील प्रसिद्ध रियलिटी शो बिग बॉस 15 ची विजेती तेजस्वी प्रकाश ठरली आहे. तेजस्वी प्रकाशला बिग बॉसच्या ट्रॉफीसह 40 लाख रुपयांचा चेक देखील मिळाला आहे. तिचा बॉयफ्रेंड करण कुंद्राचा मात्र यात पराभव झाला आहे. तेजस्वी प्रकाशचे कुटुंब संगीत कलेच्या खूपच जवळचे आहे. तेजस्वी प्रकाश ही प्रख्यात हिंदी अभिनेत्री आहे. तिचा जन्म जन्म 10 जून 1992 रोजी झाला. 28 वर्षीय तेजस्वी प्रकाशने स्टार प्लस वाहिनीवरच्या 'कर्ण संगिनी' मालिकेमध्ये उर्वीची भूमिका साकारल्याने ती घराघरात पोहोचली. 'संस्कार-धरोहर अपनों की' या मालिकेद्वारे तेजस्वीने पदार्पण केलं. 'स्वरांगिणी- जोडे रिश्तों के सूर' या मालिकेद्वारे ती घराघरात पोहोचली. रागिणी लक्ष्य महेश्वरी हे तेजस्वीने साकारलेलं पात्र प्रेक्षकांच्या लक्षात राहिले होते.
'खतरों के खिलाड़ी 10' च्या व्यतिरिक्त ती 'किचन चॅम्पियन 5', 'कॉमिडी नाइट्स लाइव्ह', 'कॉमिडी नाइट्स विद कपिल' व 'कॉमिडी नाइट्स बचाओ' सारख्या शोमध्ये दिसली आहे. तेजस्वी स्वतः एक अभियंता आहे. तिला अभिनयाची इतकी आवड निर्माण झाली की, तिने अभियंत्याची नोकरी सोडून दिली. तेजस्वी प्रकाशने मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन्स या विषयांमध्ये अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली, त्यानंतर अभियांत्रिकीची इच्छा पूर्ण झाल्यानंतर ती अभिनयाकडे वळाली. लहानपणापासूनच मनोरंजन क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं असल्याने तिने वयाच्या 18 व्या वर्षी तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. केवळ तिचे वडील गायक असल्याने ती केवळ अभिनेत्रीच नाही तर एक चांगली संगीतकार देखील आहे. तिला सतार आणि इतर वाद्ये वाजवायलाही तिच्या आई बाबांनी शिकवले आहे.
2017 मध्ये तेजस्वी प्रमुख भूमिकेत असलेला 'पहरेदार पिया' ही मालिका वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. मालिकेच्या कथानकानुसार, तेजस्वी साकारत असलेलं पात्र एका लहान मुलाशी लग्न करतं. तो मुलगा फक्त 9 वर्षांचा दाखवण्यात आला होता. बालविवाहाला प्रोत्साहन देत असल्याप्रकरणी मालिकेविरोधात ऑनलाईन याचिकाही दाखल करण्यात आली होती.
0 Comments