आशिष शेलार, भातखळकर ‘गुजरात पेंग्विन’


मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार टीका केली आहे. गुजरातमधील पेंग्विन प्रकल्पाचं स्वागत करत असताना महाराष्ट्रातील नेत्यांवर मात्र त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे. मुंबईत पेंग्विन आणल्यानंतर आदित्य ठाकरेंवर टीका करणाऱ्या आशिष शेलार आणि अतुल भातखळकर यासारख्या नेत्यांना आता ‘गुजरात पेंग्विन’ म्हणायचं का, असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. अहमदाबादमध्ये जाऊन तिथल्या पेंग्विनची आपण पाहणी करून आल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. आपण स्वखर्चाने अहमदाबादला गेलो होतो. कुणाशीही आपण तुलना केली नव्हती, तरीही इथे अनेकांना उलट्यांचा त्रास सुरू झाला, अशी टीका त्यांनी केली. 

मुंबईत आदित्य ठाकरे यांनी सर्वप्रथम कल्पना मांडली आणि पेंग्विन आणले. मुंबई ही सगळ्यात छान असून विकासासाठी पुढं असल्याचं त्या म्हणाल्या.  परदेशात अशा प्रकारच्या उद्यानांना भेट देण्यासाठी 1000 रुपयांपेक्षा अधिक खर्च येतो. मात्र मुंबईत 100 रुपयांमध्ये पूर्ण कुटुंबाला राणीची बाग पाहता येते, असं त्या म्हणाल्या. गुजरामध्ये यासाठी 264 कोटी रुपये खर्च झाले. आपल्याकडे पेंग्विनसाठी 24 तास डॉक्टर उपलब्ध असतात, गुजरातमध्ये एकही डॉक्टर नाही. अफ्रिकन पेंग्विनसाठी 50 मिमी जाडीची काच बसवण्यात आली आहे. आपले पेंग्विन गुजरातच्या तुलनेत मोठे आहेत. आपल्याकडे 17.5 कोटीत पेंग्विन कक्ष उभारण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत आणलेल्या पेंग्विनपैकी एक दगावला होता. गुजरातमध्येही 6 पेंग्विन होते, मात्र त्यातील एक कुठे गेला, हे माहित नसल्याचं त्यांनी सांगितलं.

Post a Comment

0 Comments