सोलापूर/प्रतिनिधी:
आज बुधवार,दिनांक २६ रोजी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास वळसंग पोलिस ठाणे हद्दीतील कुंभारी येथील टोल नाका येथे ट्रक क्रमांक के ए ३२ बी १७७७,बलकर ट्रक त्याचा क्रमांक एम एच १२ सी एक्स ११७१, ट्रक क्रमांक टी एन ५२ जे ३६७९ आणि ईरटीका कार त्याचा क्रमांक एम एच २५ ए एल ४०७० यांचा एकामागून एक धडक देऊन अपघात झाला.
सदर घटनास्थळी वळसंग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले,पीएसआय अजय हांचाटे,पोलीस हवालदार दासरी, वाळूजकर, बनकर, गायकवाड, होनमोरे, मोरे, सूर्यवंशी ,काळोखे असे पोलीस अंमलदार तसेच क्रेन व अंबुलन्स यांनी तात्काळ स्टाप सह जाऊन सदर ईरटीका कार मध्ये अडकलेल्या जखमींना नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले.मदत कार्य २ तास सुरू होते.जखमींची नावे पुढीलप्रमाणे सचिन सुरेंद्र खटके( वय वर्षे ३५ ), सपना सचिन खटके(वय वर्षे ३५), परमेश्वर शिवाजी सोनटक्के(वय वर्षे ४०),पल्लवी गिरिष तिवारी (वय वर्षे २८),तीन लहान मुले सर्वजण राहणार उस्मानाबाद आणि ट्रक चालक गणेशन या सर्व जखमींना सुखरूप बाहेर काढून उपचाराकरिता सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. ट्रक त्याचा क्रमांक टी एन ५२ जे ३६७९ मध्ये अडकलेल्या ट्रक ड्रायव्हरला सुखरूप बाहेर काढून उपचाराकरता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.वेळेत वळसंग पोलीस आणि स्थानिकांच्या मदतकार्यामुळे फार मोठी जीवित हानी टाळता आली.
0 Comments