बार्शी/प्रतिनिधी:
बार्शी तालुक्यातील कोरेगाव येथे या रस्त्यावरून जायचे नाही म्हणत वृद्ध पती-पत्नीस चौघा जणांनी मिळून मारहाण केल्याची घटना घडली आहे. भारत विठ्ठल पाटील (वय63) रा.कोरेगांव ता. बार्शी यांच्या फिर्यादीनुसार चौघांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या राहत्या घरासमोर तू कच्च्या रस्त्यावरून जायचे नाही व कुठल्याही प्रकारचे वाहन यायचे नाही असे म्हणत फिर्यादी व त्याच्या पत्नीला मारहाण केली. कच्च्या रोडवरून यायचे नाही तुझं कसलही वाहन आणायचे नाही असे म्हणुन फिर्यादीस शिवीगाळी करून दगडाने डोक्यात व काठीने पाठीत मारून जखमी केले आहे. तसेच सोडविण्यास आलेल्या फिर्यादीच्या पत्नीस लाथाबुक्क्याने पोटात, पाठीत व गालात मारून मुक्कामार देवुन तुम्ही पोलीसात काय केस करायचे ते करा पोलीस स्टेशन आमचे काय करेल असे म्हणुन आम्हांस जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी इसम नामे 1) विलास विठ्ठल पाटील, 2) गणेश विलास पाटील 3) निलेश विलास पाटील 4) शोभा विलास पाटील सर्व रा. कोरेगांव ता. बार्शी तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments