शेतकऱ्याच्या हक्कासाठी भगवंत सिताफळ संघर्ष समितीची स्थापना शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर



बार्शी/प्रतिनिधी:

बार्शी तालुक्यातील सिताफळ उत्पादन शेतकऱ्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी भगवंत सीताफळ उत्पादक शेतकरी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याची स्थापना केल्याची घोषणा शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी केली. सिताफळ उत्पादन नागनाथ कस्पटे यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना व नर्सरी व्यवसायिकांना नोटीस बजावून त्यांना रॉयल्टी भरण्याची नोटीस द्वारे मागणी केली आहे. सदरच्या या नोटीस बेकायदेशीर असून शेतकऱ्यावर ती दहशत माजवण्यासाठी व तालुक्यातील सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी केली आहे. 

हा कुटील डाव असल्याचे मत शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी मांडले. एन एम के वन गोल्ड या सिताफळ वाणाचे पेटंट कस्पटे यांच्या नावावर असल्याने त्यांनी तालुक्यातील इतर सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांना नोटीस बजावल्या असून त्या बेकायदेशीर आहेत याबाबत त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्याची तारीख २१ नोव्हेंबर आहे. सदरच्या याचिकेला उत्तर देण्यासाठी व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सदरची समिती काम करणार असून एन एम के वन गोल्ड या नावाने बार्शी तालुक्यातील सिताफळ उत्पादक शेतकऱ्यांनी कुठेही विक्री केलेली नाही तरीसुद्धा नागनाथ कस्पटे यांनी सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांना त्रास देण्याचे उद्देशाने न्यायालयीन आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे मी सर्व सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. असे मत शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी केले आहे.

सिताफळ वानासाठी महाराष्ट्रात पहिल्यांदाच संघर्ष समितीची स्थापना झाली, असून त्याची सुरुवात बार्शी तालुक्यातून झाली त्यामुळे सर्व सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी नागनाथ काळे (वाणेवाडी), रविंद्र शिंदे (गोरमाळे), माणिक गरदडे (वानेवाडी), स्वप्निल काटकर (कुसळम), कालिदास लावंड, संतोष काशीद (कुसळम) राजेंद्र पाटील, गोरख कस्पटे, (गोरमाळे) नितीन आवटे, आनंद गरडे, विठ्ठल गरडे, सर्जेराव शेळके, जयसिंग मोरे (गोरमाळा) असे १६ शेतकरी या संघर्ष समिती मध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार या पदावर काम करतील व या संघर्ष समितीचे मार्गदर्शक म्हणून शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर हे काम पाहणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. राजमाता इंदुताई आंधळकर अन्नछत्रा लय या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती देण्यात आली. त्यावेळी शिवसेना शहर प्रमुख दीपक भैय्या आंधळकर, बापू तेलंग, जावेद पठाण, अकबर शेख व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments