चीनमधील बिझनेस ड्रिंकिंगच्या नावाखाली अश्लिल चाळे, छेडछाड आणि बलात्कार होत असल्याचं वास्तव नुकत्याच घडलेल्या एका घटनेतून समोर आलं आहे. चीनमधील सुप्रसिद्ध अलिबाबा कंपनीत एका सिनिअर मॅनेजरनं बिझनेस ड्रिंकिंगच्या नावाखाली आपल्या सहकारी महिलेवर बलात्कार केल्याचं स्पष्ट झालं आहे. चीनमध्ये कॉर्पोरेट विश्वात काम करणाऱ्या तमाम महिलांना या बिझनसे ड्रिंकिंगची चांगलीच दहशत बसली आहे. काय आहे बिझनसे ड्रिंक चीनी संस्कृतीनुसार ज्या व्यक्तीसोबत व्यापारी संबंध दृढ करायचे असतील, त्याच्याशी वैयक्तिक संबंध वाढवले जातात. त्यासाठी त्याला पार्टी देऊन खूश केलं जातं.
यासाठी कॉर्पोरेट विश्वातील अनेक महिलांना त्यांच्यासोबत पार्टीसाठी पाठवलं जातं. संबंध दृढ कऱण्यासाठी महिलांना अशा पाहुण्यांसोबत मद्यप्राशन करावं लागतं आणि जेवढा काळ पार्टी चालेल, तेवढा काळ त्यांच्यासोबत राहावं लागतं. मात्र अनेकवेळा महिलांसोबत दारूच्या नशेत गैरव्यवहार केले जातात. महिलांना वाईट अनुभव बीबीसीनं दिलेल्या बातमीनुसार, आपल्याला वारंवार अशा कॉर्पोरेट बिझनेस ड्रिंकसाठी जावं लागत असल्याचा अनुभव एका महिलेनं शेअर केला आहे.
अनेकदा जबरदस्तीनं महिलांना अशा पार्ट्यांमध्ये सहभागी व्हावं लागतं. अनोळखी व्यक्तींकडून होणारी अश्लिल शेरेबाजी सहन करत त्यांचा मान राखण्यासाठी खोटं खोटं हसावं लागतं. या कंपनीतील एका सिनिअर मॅनेजरनं त्याच्यासोबत काम करणाऱ्या एका महिलेला बिझनेस ड्रिंकसाठी नेलं होतं. या मॅनेजरनं तिला दारू पाजल्यानंतर ती बेशुद्ध झाली.
त्यानंतर जेव्हा तिला जाग आली, तेव्हा आपल्या अंगावर कपडे नसल्याचं तिच्या लक्षात आलं. आपल्यासोबत गैरप्रकार झाल्याचं लक्षात आल्यावर तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. न्यायालयात सध्या या प्रकऱणाची सुनावणी सुरू आहे. बिझनेस ड्रिंकची मूळ कल्पना आदरातिथ्याच्या भावनेतून तयार झाली असली, तरी सध्या ती महिलांचं शोषण करणारी व्यवस्था ठरत असल्याचे अनुभव येत आहेत.
0 Comments