परंडा/प्रतिनिधी:
परंडा तालुक्यातील मौजे टाकळी येथे वडार समाजाच्या अल्पवयीन मुलीवर घडलेल्या लैंगिक अत्याचार घटनेचा निषेध नोंदवित मी वडार संघटना, आॅल इंडीया पँथर सेना, महाराष्ट्र मुस्लीम फ्रंट यांनी भुम येथे उप विभागिय अधिकारी यांना आरोपी ला फाशीची शिक्षा व्हावी व पिडीत कुटुंबाला पन्नास लाख आर्थिक मदत करुन कुटुंबाला संरक्षण देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.
टाकळी येथिल वडार समाजातील गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली पोलीसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने बाल लैंगिक शोषण कायदया अंतर्गत कारवाई कारावी. नराधमाविरोधात कारवाई करावी हे प्रकरण जलदगती न्यायालयात घेऊन अरोपाला फाशीची शिक्षा दयावी. पिडीत कुटुंबाला पन्नास लाख आर्थिक मदत करुन कुटुंबाला संरक्षण देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.व तसेच प्रशासनाने योग्य कारवाई न केल्यास भविष्यात तीव्र अंदोलन करण्यात येईल असे सर्व संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी चंद्रमणी गायकवाड मराठवाडा कार्याध्यक्ष आॅल इंडीया पँथर सेना, आसिफ जमादार मराठवाडा अध्यक्ष महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट, दिपक पवार तालुका संपर्क प्रमुख मी वडार महाराष्ट्राचा, बबन लश्कर भटक्या जाती जमाती मराठवाडा उप अध्यक्ष, महादेव मांजरे, महेंद्र गायकवाड आॅल इंडीया जिल्हा उपाध्यक्ष, मनोज लश्कर अपंग संघटना, उमेश पवार, नाना मंजुळकर, अनिल मांजरे, गोपाळ जाधव, अश्रुबा लश्कर, रमेश पवार आदींच्या सहया निवेदनावर आहेत.
0 Comments