बार्शी/प्रतिनिधी:
श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीच्या गेली ४३ वर्षे उल्लेखनीय कार्य व अंखंडीत सेवा ही रुग्णांना दिल्याबद्दल आज लायन्स क्लब ऑफ बार्शी यांनी बार्शी नगरपरिषदेचे अध्यक्ष अॅड असिफभाई तांबोळी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व तसेच १०० पेक्षा जास्त रक्तदाना करणार्या शतकवीर रक्तदात्याचा सत्कार समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लब बार्शी चे अध्यक्ष ॲड विकास जाधव हे होते यावेळी डॉ कराड सुधीर तम्मेवार,महेश सोनार,डॉ. दिलीप कराड रामेश्वर लढ्ढा व गिरीश शेटे यांचा शतकवीर रक्तदाता म्हणून सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
यावेळी नगराध्यक्ष असिफभाई तांबोळी यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगितले तसेच लायन्स क्लब बार्शी च्या उपक्रमाचे कौतुक केले.
लायन्स क्लब बार्शी चे अध्यक्ष ॲड विकास जाधव यांनी सांगितले समाजात उपद्रवी लोकांपेक्षा उपयुक्तता असलेल्या लोकांची संख्या खूप मोठी आहे त्यांचे महत्त्व अधोरेखित होणे गरजेचे आहे म्हणून सर्व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन प्रयत्न करण्याची गरज आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन विजय दिवानजी यांनी केले. आभार प्रदर्शनाचे काम लायन्स क्लब चे सचिव संतोष जोशी यांनी केले. या हंगर रिलिफ चे चेअरमन बापूसाहेब कदम गिरीश शेटे, प्रशांत पंडित संतोष जोशी खजिनदार अल्ताफ शेख दिनेश श्रीश्रीमाळ संदिप नागणे अनिल देशपांडे व नगरसेवक बापू वाणी प्रशांत बूडूख भगवंत पौळ हे प्रमुख उपस्थितीत होते.
0 Comments