मुंबईतील क्रुझवर सुरु असलेल्या रेव्ह पार्टीत ड्रग्स पार्टीवर एनसीबीनं मोठी धाड टाकत दहा जणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश आहे. त्यामुळे सध्या एकच खळबळ उडाली आहे. अशातच आता शाहरुख खानचं एक वक्तव्य जोरदार व्हायरल होत आहे.
१९९७ मध्ये शाहरुख आणि गौरीने सीमा अग्रवालच्या टाॅक शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी शाहरुखनं आपल्या मुलासाठी एक वक्तव्य केलं. त्यानुसार त्याच्या मुलाने सेक्स करावा, ड्रग्स घ्यावेत अशी माझी इच्छा असल्याचं शाहरुखनं म्हटलं होतं.
आपल्या मुलानं मुलींना इतका त्रास द्यावा की मुलींच्या पालकांनी माझ्याकडे येऊन तक्रार करावी, असं देखील शाहरुखनं शोमध्ये म्हटलं होतं. शोमध्ये बोललेल्या या गोष्टी शाहरुखनं विनोद करत म्हटल्या होत्या. मात्र आता त्याच्या मुलासोबत तेच घडत असल्याचं पहायला मिळत आहे. दरम्यान, एनसीबीनं काल रात्री क्रुझवर सुरु असलेल्या ड्रग्ज पार्टीवर छापा मारला. या प्रकरणी आठ लोकांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ३० ग्रॅम चरस, २० ग्रॅम कोकेन, २० ग्रॅम टॅबलेट्स, १० ग्रॅम एमडी जप्त करण्यात आलं आहे. या प्रकरणी दहा जणांना ताब्यात घेऊन त्यांची दहा तास चौकशी करण्यात आली.
0 Comments