केज मतदार संघाच्या भाजप आमदार नमिता मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अक्षय मुंदडा हे राज्याच्या माजी दिवगंत मंत्री विमल मुंदडा यांचे सुपुत्र आहेत. अक्षय मुंदडा यांच्या पत्नी नमिता मुंदडा या केज मतदारसंघाच्या आमदार आहेत. अक्षय मुंदडांनी आपल्या तक्रारीमध्ये लिहीलं आहे की, ऋषीकेश अण्णासाहेब लोमटेने फोन करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्या फोन कॉलची ऑडियो क्लिप आता दोन महिन्यानंतर व्हायरल झाली आहे.
अक्षय मुंदडांच्या फिर्यादीनुसार अंबाजोगाई पोलीस ठाण्यात कलम ५००,५०४, ५०६ अन्वये ऋषीकेश लोमटेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषिकेश लोमटेने मागील दोन महिन्यापूर्वी देवस्थानच्या रस्त्याच्या कामासंदर्भात फोन केला होता. लोमटेने रस्ताचे काम करू देण्याची मागणी केली होती.
0 Comments