परंडा/प्रतिनिधी:
परंडा तालुक्यातील खासगाव येथे मधुकर सुदाम जगदाळे यांच्या घरावर दि ०२/१०/२१ रोजी शनिवारच्या रात्रीच्या दरम्यान घरावर विज कोसळली.
घरामध्ये पाच व्यक्ती झोपलेल्या होत्या देव तारी त्याला कोण मारी ” या म्हणी प्रमाणे घरातील व्यक्तीला कोणालाही हानी झालेली नाही, घरावरील पत्रे फाडून वीज घरातील भींतीला वेज पाडून बाहेर निघाली आहे. घरामधील वायरिंग बोर्ड टिव्ही फॅन सर्व इलेक्ट्रीक वस्तु जळाल्या आहेत घरावारील वरवंडी विठा घरासमोर पडल्या आहे.
मधुकर जगदाळे यांच्या झोपलेल्या ठिकाणापासून एक फुटावर विज पडली आहे वीज पत्रा फोडुन घरात शिरुन भिंत चिरुन बाहेर निघाली आहे, एक दिड वर्षाचे बाळ त्या खोलीत खेळत होते बाळालाही काही ईजा झालेली नाही त्या बाळाचा व कुटुंबातील व्यक्ती चा पुनर्जन्म झाला असून तरी शासनाने शेतकरी कुटुंबाला वेळीत अर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी.
0 Comments