पुणे शहरातील कोथरुडमध्ये एका पोलीस अधिकाऱ्यानेच एका तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली असून त्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. जनतेला सुरक्षा देणाऱ्या अधिकाऱ्याकडूनच अशी घटना झाल्यामुळे खळबळ माजली आहे.
संशयित आरोपी प्रवीण नागेश जर्दे हा पोलीस अधिकारी हा कोथरुडमध्ये पीएसआय या पदावर काम करत होता. त्याच्या विरोधात एका पीडित तरुणीने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. येरवाडा पोलीस वाहतूक विभागात सध्या तो पोलीस उपनिरीक्षकपदी कार्यरत आहे. याने पीडित तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून पुणे आणि परिसरातील विविध ठिकाणी तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्याने आपले पहिले लग्न झाल्याचेही लपवून ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्या तरुणीने लग्नाची मागणी केल्यावर तिला टाळाटाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
कोथरुड पोलीस ठाण्यात २०१८ मध्ये एका प्रकरणात तपास करताना आरोपीच्या बहिणीसोबत जर्देची ओळख झाली. त्यानंतर आरोपीने तिच्याशी जवळीस वाढवली. आपले पहिले लग्न झाल्याचे लपवून ठेवत लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने बलात्कार केला. संशयित आरोपी गर्दे याने पोलीस खात्याचा धाक दाखवत माझे कुणीही काहीही वाकडे करू शकत नाही असे म्हणत पिडीत तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी कोथरुड पोलीस अधिक तपास करत आहेत.
1 Comments
यामुळे तर महाराष्ट्र पोलीस सरकार बदनाम झाले आहे
ReplyDelete