करमाळा! अर्जुननगर येथे मोफत ७/१२ वाटप कार्यक्रम संपन्न


करमाळा/प्रतिनिधी:
      
ग्रामपंचायत अर्ज नगर येथे महात्मा गांधी जयंतीनिमित्त व भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत गावातील सर्व शेतकऱ्यांना मोफत व घरपोच सातबारा उताऱ्याचे वाटप करण्यात आले.
         
मोफत सातबारा वाटप कार्यक्रमासाठी करमाळा तहसील कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार जाधव महसूल तहसीलदार बदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गावात मोफत सातबारा वाटप कार्यक्रमासाठी अर्जुन नगर गावचे अर्जुन नगर मंडळचे मंडळाधिकारी काजी, गाव कामगार तलाठी कसबे यांनी विशेष परिश्रम घेतले.
      
(Advertise)

 प्रथमता ग्रामपंचायत च्या वतीने आलेल्या सर्व पाहुण्यांचे चा सत्कार अर्जुन नगर ग्रामपंचायत चे सरपंच प्रकाश थोरात ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी प्रवीण भोगे भाऊसाहेब यांच्या हस्ते संपन्न झाला. सोबतच महसूल प्रशासनाच्या वतीने कोरोना कालावधीत कोरोना तपासणी विलगीकरण व लसीकरणात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अर्जुन नगरचे सरपंच प्रकाश थोरात व ग्रामसेवक मनोज लटके यांचा विशेष सन्मान करण्यात आला. महसूल प्रशासनाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात प्रथमच अर्जुन नगर येथे मोफत सातबारा वाटप करण्यात आल्याचे नायब तहसीलदार जाधव यांनी सांगितले, तसेच गावातील महसूलच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार व मदत करणार असल्याचे श्री बदे यांनी सांगितले सदर कार्यक्रमासाठी कृषी सहाय्यक माने, मुख्याध्यापक संजू कांबळे, पोलीस पाटील रामदास पवार, सरपंच आश्विनी थोरात, उपसरपंच अभिमन्यू धुमाळ, सर्व ग्रामपंचायत सदस्य व अर्जुन नगर गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब आडसुळ यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य अमोल पवार यांनी केले.

Post a Comment

0 Comments