सर्व खड्डे बुजवुन या रस्त्याच्या दुरुस्त्या करण्यात याव्या अन्यथा पुन्हा आंदोलन करणार
बार्शी/प्रतिनिधी:
बार्शी- मोहोळ, वैराग- माढा, मालवंडी – अंजनगांव या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या मागणी साठी मालवंडी (ता. बार्शी) पंचक्रोशीतील आठ गावांमधील ग्रामस्थांनी आज सकाळी १०.४५ पासुन रस्तारोको आंदोलन केले. मालवंडी च्या एसटी स्टँड चौकात हे आंदोलन दोन तास चालले. शेवटी सार्व. बांध. बार्शी उपविभागाचे उपअभियंता सौरभ होनमुटे यांना शिवाजी पाटील, विजय रणदिवे यांचे हस्ते निवेदन देऊन आंदोलन थांबले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वा खाली पार पडलेल्या या रस्ता रोको आंदोलनात बार्शी मधील मालवंडी, तुर्क पिपरी, गुळपोळी, सुर्डी, तर माढा मधील जामगाव, मानेगांव, कापसेवाडी, अंजनगांव या गावातील प्रमुख ग्रामस्थ सहभागी झाले होते.
मालवंडी हे पंचक्रोशीतील महत्वाची बाजारपेठ केंद्र आहे. इथुनच बार्शी, वैराग, माढा, मोहोळ ला जाणारे रस्ते जोडलेले आहेत, पण या रस्त्याचे खड्डे तसेच साईड पट्टया व तत्सम दुरुस्त्या गेल्या १० वर्षापासुन झालेल्या नाहीत. परिणामी या रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहनांचे सतत अपघात होत असतात. त्यामुळे अनेकांना आपले जीव गमावावे लागले आहेत तर कित्येकांना कायमचे अपंगत्व आले आहे. याच मार्गावरून साखर कारखाने सुरु झाल्यानंतर ऊस वाहतुक ही मोठ्या प्रमाणात सुरु असते. त्यावेळी तर प्रत्येक वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असतो. तेव्हा दसऱ्या पुर्वी सर्व खड्डे बुजवुन या रस्त्याच्या दुरुस्त्या करण्यात याव्या अन्यथा दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सार्वजनिक बांधकाम विभागांच्या अधिकारी कर्मचारी यांना कोंडून टाकण्याचे आंदोलन करण्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटणेच्या वतीने यावेळी जाहीर करण्यात आले.
यावेळी आंदोलनातील महत्वाच्या विषयांवर जि. प. सदस्य श्रीमंत थोरात, सुहास पाटील, प्रा. लहू घुले, महेश होनमाने, शिवाजी पाटील, विश्वजीत पाटील, विजय रणदीवे, शिरीष चिकणे, फुलचंद चतुर यांनी आपली मनोगतं व्यक्त केली.
आंदोलन स्थळी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत थोरात, माजी तालुका पंचायत समिति सदस्य बाबासाहेब काटे, मालवंडीचे सरपंच हनुमंत होनमाने स्वाभिमानी संघटनेचे युवा जिल्हा अध्यक्ष विजय रणदिवे, जिल्हा अध्यक्ष शिवाजी भाऊ पाटील, कार्याध्यक्ष अजीनाथ परबत, माढा तालुका अध्यक्ष सत्यवान गायकवाड, रामराव काटे पाटील, बार्शी युवक अध्यक्ष शरद भालेकर, मानेगाव अध्यक्ष विश्वजित पाटील , उपसरपंच विष्णु चह्वाण राम घेवारे दादासाहेब खंडागळे,महेश होनमाने , तुर्कपिंपरीचे उपसरपंच फुलचंद चतुर, प्रा. डॉ. लहू घुले, पंडित लोंढे, नागनाथ झळके,नेताजी शेळके पंडित लोंढे नवनाथ झळके, वसंत शेळके. माढा कृषि उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष सुहास काका पाटील, सुजित पाटील, गुळपोळीचे सरपंच अमोल नरखेडे, शिरीष चिकणे, कल्याण चिकणे अंजनगावचे मा. सरपंच गणेश काशीद, शब्बीर पठाण, कापसेवाडीचे सागर कापसे, बापू जगताप केवडचे सागर धर्मे, सूर्डीचे बालाजी शेळके यावलीचे खरात सर, कळबट सर दारफळचे आडकर सर व सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
आंदोलना दरम्यान बार्शी ग्रामिणचे उपनिरिक्षक प्रविण जाधव यांचे मार्गदर्शना खाली बीट अंमलदार रियाज शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
0 Comments