ग्रामीण पोलीस दलातील शिपायाचे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने रोख रकमेसह ३ लाख३५ हजाराचे दागिने पळविले. ही चोरी करमाळा तालुक्यातील केम येथे घडली . चोरट्याने पोलिसांचे घर दिवसा फोडल्यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे.
केम (ता.करमाळा) येथे किशोर शिवाजी तळेकर हे पोलीस शिपाई राहण्यास असून, ते टेंभुर्णी येथे नेमणुकीस आहेत. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामाला गेले होते. दुपारी एक ते चार या दरम्यान चोरट्याने यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरुमच्या कपाटा मधील रोख १५ हजार रुपये आणि १०० ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण३ लाख ३५ हजाराचा ऐवज पळविला. हा प्रकार घडल्यानंतर किशोर तळेकर यांनी करमाळा पोलिसात चोरीची फिर्याद दाखल केली.
0 Comments