श्रीमंतराजे प्रतिष्ठाणच्या वतीने रुग्णांना फळ वाटपपरंडा/प्रतिनिधी :
(Advertise)

१७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीमध्ये सेवा समर्पण अभियान अंतर्गत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस,पंडित दीनदयाळ उपाध्याय, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महा एन जी फेडरेशन महाराष्ट्र व श्रीमंतराजे प्रतिष्ठाण कपिलापुरी यांच्या वतीने  उपजिल्हा रुग्णालय परंडा या ठिकाणी उपचार घेत असलेले,प्रसूती रुग्ण यांना फळ वाटप करण्यात आले.या प्रसंगी भरत ननवरे,प्रतिक दळवे,जयदीप पाटील,अझहर मुजावर,बिपिन शिंदे,भैरवनाथ नाईकवाडी,नागनाथ नरुटे,महेश्वर खराडे व  प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रणजीत महादेव पाटील इ. उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments